बीड : दारुड्या पतीसोबत भांडण झाल्यानंतर पत्नीने दोरीने गळा आवळून (Wife strangles drunken husband) पतीचा खून (Wife Killed Husband) केला आणि त्यानेच गळफास घेतल्याचा कांगावा (Faking hanging by husband) केल्याची घटना परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा येथे घडली आहे. याप्रकरणी पत्नीवर खुनाचा गुन्हा नोंद (murder case against wife) करण्यात आला आहे. गेवराईची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा परळीत त्याच प्रकारे घटना घडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. Latest news from Beed, Beed Crime
नवऱ्याला जीवे मारले, अन्...हनुमान उर्फ राजाभाऊ अशोक काकडे वय 30 हिवरा तालुका परळी असे मयत व्यक्तीचे नाव आहे. शिरसाळा पोलीस ठाण्यातील कर्मचारी बुरान नसीर शेख यांच्या फिर्यादीनुसार 11 नोव्हेंबर रोजी रात्री हनुमान दारू पिऊन घरी आला. त्यानंतर त्याने पत्नी वैष्णवी हिच्यासोबत भांडण केले. त्यानंतर वैष्णवीने खोलीचा दरवाजा लावून त्याचे आयुष्य संपविले आणि त्यानेच गळफास घेतल्याचा कांगावा केला.