परळीत पतीसाठी पत्नी 'डोअर टू डोअर'; राजश्री धनंजय मुंडे यांच्या जनसंपर्क दौर्याने चर्चेला उधाण - पंकजा मुंडे
परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्याविरोधात धनंजय मुंडे यांनी आपली तयारी सुरू केली आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केली आहे. याचाच एक भाग म्हणजे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांना देखील जनसंपर्क दौऱ्यामध्ये उतरवले आहे.
राजश्री धनंजय मुंडे यांचा जनसंपर्क दौरा
बीड - काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय नेते मोर्चेबांधणी करत आहेत. राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये नणंद पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांना शह देण्यासाठी वहिनी म्हणजेच राजश्री धनंजय मुंडे जनसामान्यांमध्ये उतरल्या आहेत. पती धनंजय मुंडे यांच्यासाठी त्या 'डोअर टू डोअर' फिरून नागरिकांशी संपर्क साधत आहेत.