महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये ३१ मार्चपर्यंत आठवडी बाजार, यात्रा बंद - Yatra closed till 31st March in Beed

बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिमाकडकपणे राबविल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता गृह विलगीकरणातील व्यक्तींच्या हातावर शिक्के मारण्यात येणार आहेत. सार्वजनिक स्वरुपाचे मेळावे आणि संमेलने बंद करण्यात येत आहेत.

बीडमध्ये ३१ मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद
बीडमध्ये ३१ मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद

By

Published : Mar 6, 2021, 8:12 AM IST

बीड -राज्याच्या इतर भागांसोबतच बीड जिल्ह्यातही कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. त्यानुसार ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील आठवडी बाजार, यात्रा बंद करण्यात आल्या असून खासगी कोचिंग क्लासेस देखील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप

बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिमाकडकपणे राबविल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता गृह विलगीकरणातील व्यक्तींच्या हातावर शिक्के मारण्यात येणार आहेत. सार्वजनिक स्वरुपाचे मेळावे आणि संमेलने बंद करण्यात येत आहेत.

खासगी कोचिंग क्लासेस, यात्रा, आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. शहरी भागात कंटेनमेंट झोनचा निर्णय मुख्याधिकारी तर ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकारी घेणार आहेत.

महाशिवरात्री उत्सव रद्द -

बीड जिल्ह्यातील परळी हे ज्योतिर्लिंग असल्याने या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. परळीच्या वैद्यनाथ देवस्थानाने या यात्रेची मोठी तयारी केली होती. मात्र या ठिकाणी होणारी गर्दी आणि कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग पाहता परळी येथील महाशिवरात्री उत्सव रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी घेतला आहे.

हेही वाचा - स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राचा नवा राष्ट्रीय विक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details