महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Abdul Sattar: आम्हाला आता अब्दुल सत्तारांची माफी नाही तर राजीनामा पाहिजे; राष्ट्रवादी आक्रमक - सत्तारांची माफी नाही तर राजीनामा

Abdul Sattar: आम्हाला आता अब्दुल सत्तारांची माफी नाही तर राजीनामा पाहिजे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध करण्यात आले आहे. MP Supriya Sule खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल अब्दुल सत्तारांनी केलेल्या वक्तव्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

nationalist aggression
nationalist aggression

By

Published : Nov 8, 2022, 3:55 PM IST

बीड: आम्हाला आता अब्दुल सत्तारांची माफी नाही तर राजीनामा पाहिजे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध करण्यात आले आहे. MP Supriya Sule खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल अब्दुल सत्तारांनी केलेल्या वक्तव्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते. यावेळी घोषणा देण्यात आल्या पन्नास खोके एकदम ओके, अब्दुल सत्तारांचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, अशा घोषणा देण्यात दिले आहेत. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी ही मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

राष्ट्रवादी आक्रमक

महाराजांचा वारसा जपणारा महाराष्ट्र अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल जे बेताल वक्तव्य केले आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो. अब्दुल सत्तार जेव्हा आपण बोलतो, तेव्हा तिच थुंकी आपल्या स्वतःच्या तोंडावर येते ते लक्षात ठेवा. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरी विचारांचा आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारा महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्र मध्ये आपण असे बेताल वक्तव्य करता. आपण याच महाराष्ट्रात मंत्रिपद भूषवता त्याची तुम्हाला लाज वाटू द्या. लायकी नसतानाही पद दिले, लायकीचे शब्द काढले आहेत. त्याबद्दल आम्ही सर्व बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो.

महिला राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक राष्ट्रवादीपार्टी कडून आम्ही त्यांचा प्रथम जाहीर निषेध करतो. त्यांनी जे आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दलचे वक्तव्य केलं आहे, निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज आंदोलन छेडले आहे. आम्हाला आता अब्दुल सत्तारांची माफी नाही, तर त्यांचा राजीनामा पाहिजे. मनवादी सरकारने यावेळी सरकारने काय चालवलं आहे. भिकारचोट चाळे ते करत आहेत. आणि आमच्या एका कर्तृत्ववान महिलेला असं बोलणं त्यांना शोभत नाही. त्यांनी जे सुप्रियाताईंना शिवी दिली आहे. त्याच्यावर आता आम्ही माफी नाही, तर त्यांचा राजीनामा आम्हाला हवा, अशीच मागणी बीड जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

सुप्रियाताई सुळे हे महाराष्ट्राची सुपुत्र सुप्रियाताई सुळे आमची बहीण आहे, आणि ती महाराष्ट्राची सुपुत्र आहे. अब्दुल सत्तार म्हणाले तुमची लायकी काय आणि काय म्हणता. बोलणाऱ्या आणि कापणाऱ्या समाजाने म्हणावे की तुम्ही महाराष्ट्राच्या कन्येबद्दल बोलत आहात. आम्ही महाराष्ट्रातील जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे खपवून घेणार नाही, आम्ही त्यांना त्याची जागा दाखवुन देऊ. अब्दुल सत्तार बीडमध्ये आल्यास बंदी घालू, आणि आम्ही त्यांना प्रतिबंधित करू, यावरुन राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details