बीड -पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटले तरी देखील पाऊस पडत नसल्याने बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मांजरा धरण कोरडे पडले आहेत. त्यावर बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना धरणातून होणारा पाणीपुरवठा ऑक्टोंबर पासून बंद करण्याचा निर्णय लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे लातूर शहराला पुन्हा एकदा रेल्वेने पाणी देण्याची परस्थिती ओढवली आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे सिंचन प्रकल्प कोरडेठाक आहेत. बीड जिल्ह्यातील 144 सिंचन प्रकल्पापैकी 109 सिंचन प्रकल्प आजही कोरडेठाक पडले आहेत. परतीच्या पावसावरच या सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे. केज तालुक्यातील मांजरा धरण धरणातून लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा होत होता. मात्र, या धरणातील पाणी संपले आहे. त्यामुळे 1 ऑक्टोंबर पासून लातूर शहरासह उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील गावांना होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे लातूरचे जिल्हाधिकारी श्रीधर यांनी बैठक घेऊन सांगितले आहे.