आष्टी(बीड) - आष्टी विधानसभा मतदारसंघ-231 अंतर्गत आष्टी तालुक्यातील मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये फोटो नसलेल्या मतदारांचे फोटो जमा करणे, दुबार नावे वगळणे, लॉजिकल error दूर करणे हे कामं सुरू आहेत. ज्या मतदारांच्या मतदार यादीत चुका असतील त्यांनी या मोहिमेत चुका दुरूस्त करून घेण्याचे आवाहन तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी केले.
आष्टीत मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू; चुका असतील तर दुरूस्त करून घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन
आष्टी विधानसभा मतदारसंघ-231 अंतर्गत आष्टी तालुक्यातील मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.
आष्टी येथील तहसिल कार्यालयात पञकारांशी संवाध साधतांना ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार प्रदिप पांडूळे, अव्वल कारकून आर.ए.पवार हे उपस्थितीत होते. पुढे बोलतांना तहसीलदार कदम म्हणाले, आष्टी तालुक्यात मतदार शुद्धीकरणाचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे. तालुक्यात एकूण 2 लाख पाच हजार 249 मतदार असून यापैकी अजूनही 1 हजार 985 मतदारांचे फोटो जमा झालेले नाहीत. तसेच ज्या मतदारांच्या मतदार यादीत नावे चुकणे, फोटो नसणे किंवा फोटो बदलणे अशा मतदारांनी तहसील कार्यालय आष्टी किंवा संबंधित BLO यांच्याकडे देण्यात यावेत अन्यथा आपले नाव यादीतून वगळण्यात येईल. याचबरोबर आष्टी तालुक्यात 124 मतदार DSE (DEMOGRAPHICAL SIMILAR ENTRY) म्हणजे दुबार आहेत अशा मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांनाही आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपले एक नाव वगळणेबाबत BLO कडे नमुना 7 चा फॉर्म भरून द्यावा.
सदर कार्यक्रम कालमर्यादीत असल्याने तालुक्यातील मतदारांनी तत्काळ तहसील कार्यालयात नायब तहसीलदार प्रदिप पांडूळे किंवा BLO यांच्याशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी केले आहे.