महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 18, 2020, 3:34 PM IST

ETV Bharat / state

गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; पावसामुळे सांडस चिंचोली परिसरातील गावांचा तुटला संपर्क

दरवर्षी मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असते. यंदा मात्र चांगला पाऊस होत आहे. जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे गोदावरी नदीला पाणी आले आहे. सांडस चिंचोली परिसरातील गावांचा संपर्क काही वेळासाठी तुटला होता. शुक्रवारी दुपारनंतर मात्र पाणी कमी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सध्या येथील गावांना कुठलाही धोका नसल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.

बीड पाऊस बातमी
बीड पाऊस बातमी

बीड - जायकवाडी धरणाचे पाणी सोडल्यामुळे आणि गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. जिल्ह्यामधील माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावाच्या परिसरातील काही छोट्या गावांचा संपर्क तुटला आहे.

गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
दरवर्षी मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असते. यंदा मात्र चांगला पाऊस होत आहे. यातच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे गोदावरी नदीला पाणी आले आहे. माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली हे गाव गोदाकाठी वसलेले आहे. या गावासह गोदाकाठच्या इतर गावांनाही जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, सांडस चिंचोली परिसरातील गावांचा संपर्क काही वेळासाठी तुटला होता. शुक्रवारी दुपारनंतर मात्र पाणी कमी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सध्या येथील गावांना कुठलाही धोका नसल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.बीड तालुक्यातील बिंदुसराही ओव्हरफ्लो -जिल्ह्यातील अकराही तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला असून बीड तालुक्यातील बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. याचा परिणाम बीड शहरातून गेलेल्या बिंदुसरा नदी पात्रालगतच्या वस्तीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे बीड नगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details