बीड - परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याला बुधवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वैद्यनाथ साखर कारखान्यात आग; लाखो रुपयांचे नुकसान - loss
आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साखर कारखान्याच्या परिसरातच अग्निशमन दलाची गाडी उभी असल्याने तत्काळ आग विझवण्यासाठी मदत मिळाली.
ही आग प्रथम कारखान्याच्या परिसरातील भुशाला लागली. त्यानंतर ही आग प्रचंड रूप धारण करत सर्वत्र पसरली. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साखर कारखान्याच्या परिसरातच अग्निशमन दलाची गाडी उभी असल्याने तत्काळ आग विझवण्यासाठी मदत मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग आटोक्यात असून नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, याचा नेमका आकडा अद्याप सांगता येणार नाही. आगीचे स्वरूप मोठे होते. मात्र अग्निशमन विभागाच्या गाड्या वेळेत आल्याने आग आटोक्यात आली आहे.
आगीमुळे कारखाना परिसरातील लोखंडी अँगल व काही कारखान्यातील साहित्यदेखील जळाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आग आटोक्यात आहे.