बीड - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाला जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. महाविकास आघाडीप्रणित शेतकरी विकास पॅनलला ६ पैकी ५ जागा मिळाल्या आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आघाडीने ६ उमेदवार रिंगणात उतरवले होते. या विजयामुळे धनंजय मुंडे समर्थकांकडून मोठा जल्लोष करण्यात येत आहे.
भाजपा नेत्यांनी ऐन मतदानाच्या एका दिवसापूर्वी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घातला होता. परंतु माजी पालकमंत्र्यांच्या आदेशाला झुगारत जवळपास ६०% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदानापैकी ९५%पेक्षा अधिक मतदान हे महाविकास आघाडीला मिळाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीचे भाऊसाहेब नाटकर (४२ मते), अमोल आंधळे (२२३ मते), रवींद्र दळवी (७२० मते), कल्याण आखाडे (७१६ मते), सूर्यभान मुंडे (७१० मते) मिळवून विजयी झाले तर गंगाधर आगे यांना ३६ मते मिळाली, याठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी ९३ मते घेऊन विजयी झाले आहे.
जिल्हा बँकेतील मक्तेदारी मोडीत - धनंजय मुंडे
केवळ ८ जागांवर निवडणूक होत असताना जिल्हा बँकेशी संलग्न मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला आहे. निवडणुकीवर बहिष्कार घालून, आपल्याच मतदारांवर अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे भाजपाची मक्तेदारी या निकालाने मोडीत निघाली आहे, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. मुंडे यांनी सर्वच नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय येणाऱ्या काळात घेतले जातील, असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
बीड जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 'शेतकरी विकास पॅनल'चा विजय - बीड लेटेस्ट न्युज
महाविकास आघाडीचे भाऊसाहेब नाटकर (४२ मते), अमोल आंधळे (२२३ मते), रवींद्र दळवी (७२० मते), कल्याण आखाडे (७१६ मते), सूर्यभान मुंडे (७१० मते) मिळवून विजयी झाले तर गंगाधर आगे यांना ३६ मते मिळाली, याठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी ९३ मते घेऊन विजयी झाले आहे.
विजयी जल्लोश