बीड - शहरात भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे. तसेच त्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासासंदर्भात आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. शेतकरी, भाजीपाला विक्रेते यांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केलयं. यानंतर भाजीपाला अडत मार्केटसह फळ विक्रेत्यांचा बेमुदत बंद मागे घेण्यात आला आहे. उद्या पासून जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेतच बाजारपेठ खुली राहणार आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अडत मार्केटमधील भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना मारहाण केली होती.या प्रकारामुळे फळे, भाजीपाला विक्री करणारे तसेच अडत मार्केटमधील व्यापाऱ्यांनी काल बेमुदत संप पुकारला. यावर आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम यांनी बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांच्याशी चर्चा केली.
...अखेर संप मागे! आमदार संदीप क्षीरसागर यांची मध्यस्ती - lockdown in beed
शहरात भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे. तसेच त्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासासंदर्भात आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. यानंतर भाजीपाला अडत मार्केटसह फळ विक्रेत्यांचा बेमुदत बंद मागे घेण्यात आला आहे.
कोरोनाशी लढताना सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये, अशी भूमिका आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली. यावर मुख्याधिकारी, अडत मार्केटमधील भाजीपाला विक्रेते ,शेतकरी प्रतिनिधी यांमध्ये चर्चा झाली. त्यानुसार, शेतकरी भाजीपाला विक्री दरम्यान पालिका प्रशासनाचे प्रतिनिधी लक्ष ठेवतील, असे सांगण्यात आले. तसेच गर्दी होणार नाही, याची ते खातरजमा करतील. याचसोबत सर्वांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यानुसार भाजीपाला अडत मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आपला बंद मागे घेतल्याचे जुनेद बागवान यांनी सांगितले आहे.