परळी (बीड) जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळीचे वैद्यनाथ मंदिर येत्या 22 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हादंडाधिकारी रविंद्र जगताप यांनी मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान यंदाचा महाशिवरात्रीचा उत्सव देखील रद्द करण्यात आला होता.
कोरोनाच्या पार्श्वभीवर येत्या 22 मार्चपर्यंत वैद्यनाथ मंदिर दर्शनासाठी बंद - Beed District Latest News
जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळीचे वैद्यनाथ मंदिर येत्या 22 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हादंडाधिकारी रविंद्र जगताप यांनी मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान यंदाचा महाशिवरात्रीचा उत्सव देखील रद्द करण्यात आला होता.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
गेल्या मार्चपासून राज्यात कोरोनाची साथ आहे. परळीमध्ये देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान 12 जोतिर्लिंगांपैकी एक असेलेल्या वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात. गर्दी वाढल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे खबरदारी म्हणून मंदिर 22 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या कालावधित वैद्यनाथाची पुजा कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून, करण्यास पूजाऱ्याला परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीविरोधात कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.