महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंत्यविधीला लाकूड वापरण्यापेक्षा विद्युत शवदाहिनीचा वापर करा - पर्यावरणप्रेमींची मागणी

एका व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी किमान 5 क्विंटल लाकूड लागते. दररोज वीस ते तीस जणांचा बीड जिल्ह्यात मृत्यू होतो. त्या प्रमाणात अंत्यविधीसाठी लाकडाचा वापर केला जात आहे. ही बाब पर्यावरणासाठी प्रचंड हानिकारक असून कोरोनाच्या संकटकाळातच पर्यावरणाचे अजून एक नवे संकट आपण यानिमित्ताने ओढवून घेत आहोत. अशी भीती व्यक्त केली आहे.

beed news update
जिल्हाधिकारी कार्यालय, बीड

By

Published : May 16, 2021, 9:46 AM IST

बीड - सध्या कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दिवसाकाठी 20 ते 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. या दरम्यान अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात लाकूड वापरले जात आहे. सध्याच्या काळात ऑक्सिजन देणारी लाकडे जाळण्यासाठी वापरल्यामुळे भविष्यात पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनू शकतो. यासाठी जिल्हा प्रशासनाने अंत्यविधीला लाकूड वापरण्यापेक्षा विद्युत शवदाहिनीचा वापर करावा, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे केली आहे.

अंत्यविधीसाठी लाकडाचा वापर टाळा - पर्यावरणप्रेमींची मागणी

आतापर्यंत 1 हजार 322 जणांचा मृत्यू -

बीड जिल्ह्यात कोरोनाच्या संकट काळात आतापर्यंत 1 हजार 322 जणांचा मृत्यू झाला आहे. या बिकट परिस्थितीमध्ये ऑक्सिजनचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत ऑक्सिजन देणारी झाडे वाचवण्याची व वाढवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. बीडमध्ये पर्यावरण संवर्धन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना एक निवेदन दिले आहे.

ऑक्सिजन देणारी झाडे वाचावीत -

एका व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी किमान 5 क्विंटल लाकूड लागते. दररोज वीस ते तीस जणांचा बीड जिल्ह्यात मृत्यू होतो. त्या प्रमाणात अंत्यविधीसाठी लाकडाचा वापर केला जात आहे. ही बाब पर्यावरणासाठी प्रचंड हानिकारक असून कोरोनाच्या संकटकाळातच पर्यावरणाचे अजून एक नवे संकट आपण यानिमित्ताने ओढवून घेत आहोत. अशी भीती व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासनाने अंत्यविधीसाठी विद्युत शवदाहिनीचा वापर करावा, बीड शहरात तात्काळ विद्युत शव दाहिनी उभारावी व ऑक्सिजन देणारी झाडे वाचावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी तथा ज्येष्ठ पत्रकार बालाजी तोंडे, सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे, तत्वशिल कांबळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

पर्यावरण रक्षण ही सर्वांची जबाबदारी -

कोरोनाच्या बिकट काळात अंत्यविधी दरम्यान मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर केला जात आहे. आम्ही जर पृथ्वीवरील वृक्षतोड करून चंद्रावर पाणी शोधणारा असुत तर हे चुकीचे आहे. कोरोनाचे संकट तर आलेलेच आहे, मात्र याबरोबरच पुन्हा एका नव्या संकटाला आपल्याला सामोरे जावे लागेल. त्यामुळे पर्यावरण रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. असे यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार तथा वृक्षमित्र बालाजी तोंडे म्हणाले.

अंत्यविधीसाठी लाकडाचा वापर टाळावा -

जर आम्ही विद्युत शव दाहिनी तात्काळ करू शकलो नाही तर शेकडो टन लाकूड आपण केवळ अंत्यविधीसाठी वापरलेले असेल, यासाठी मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यातील झाडांची कत्तल करावी लागणार, याचा परिणाम ऑक्सिजन देणारी झाडे आम्ही नष्ट करत आहोत. जिल्हा प्रशासनाने तात्काळ बीड शहरासह अकरा ही तालुक्यामध्ये विद्युत शव दाहिनी तयार करून अंत्यविधी करावेत, लाकडाचा वापर टाळावा अशी मागणी यावेळी पर्यावरण संवर्धन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. असे सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे व तत्वशिल कांबळे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.

हेही वाचा - कृषी पर्यटन दिन : कोरोनात्तोर काळात कृषी पर्यटनाला मिळेल मोठी चालना

ABOUT THE AUTHOR

...view details