बीड -जिल्ह्यात तुरळक ठिकाणी रविवारी दुपारी तीन वाजता अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे बीड तालुक्यासह परिसरातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. याशिवाय गावरान आंब्याला मोठा फटका बसला आहे.
बीडमध्ये दीड तास अवकाळी पावसाची हजेरी; रब्बी पिकांचे अतोनात नुकसान - बीडमध्ये अवकाळी पाऊस
बीड जिल्ह्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे अस्मानी संकटाच्या विळख्यात सापडला आहे. रविवारी दुपारी चार वाजता अचानक वादळी वार्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
बीड जिल्ह्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे अस्मानी संकटाच्या विळख्यात सापडला आहे. रविवारी दुपारी चार वाजता अचानक वादळी वार्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, बीड परिसरात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे ज्वारीचे पीक भुईसपाट झाले आहे. अवकाळी पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. शेतकऱ्यांनी ज्वारीची कापणी करून ठेवली होती. इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय गावरान आंब्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा -सांगलीत अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; द्राक्ष बागांना फटका