अवकाळी आणि गारपिटीने शेतकरी हवालदिल बीड :एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला माल घरामध्येच ठेवलेला आहे. कापूस, सोयाबीन हा माल शेतकऱ्याच्या अजूनही घरांमध्येच आहे एकीकडे शेतकऱ्यांना शासन आश्वासन देते, मात्र शेतीमालांना हमीभाव मिळत नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला भाव मिळत नाही. कापसाला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अस्मानीबरोबर सुलतानी संकटाचाही सामना करावा लागत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे.
वीज कोसळून 20 जनावरांचा मृत्यू : बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई आष्टी, पाटोदा, केज या तालुक्यात जवळपास 2762 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. वीज कोसळून 20 जनावरांचा मृत्यू झाला आहे.अनेक शेतकऱ्यांचे भाजीपाला, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिटीचा आणि विजांचा तडाखा बसल्याने जनावरांचे नुकसान झाले आहे. याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक दुभती जनावरे गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, गारपीट आणि वादळी वाऱ्याने शेत पिकांसह डाळिंब, लिंबू, द्राक्ष, आंबा, कांदा, मिरची व भाजीपाला पिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बाधित क्षेत्र :बीड जिल्ह्यामध्ये एकूण 100 गावे बाधित झाले आहेत. त्यामध्ये बीड तालुक्यातील 12 गावे बाधित झाले आहेत. 623 शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे तर त्यांचे बाधित क्षेत्र 423 हेक्टर आहे. गेवराई तालुक्यात 48 गावे बाधित २७३ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे, तर 177 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाला आहे. आष्टी तालुक्यात 18 गावे बाधित असून 630 शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे, तर 342 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पाटोदा तालुक्यात 7 गावे बाधित आहेत, त्यामध्ये 125 शेतकरी यांना त्याचा फटका बसला आहे तर 65.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. केज तालुक्यामध्ये 15 गावे बाधित आहेत, तर 2676 शेतकरी यांना त्याचा फटका बसला आहे, तर 1755 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, असे एकूण 100 गावे व 4327 शेतकरी व 2762.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जवळपास 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान बीड जिल्ह्यात झालेले आहे.
अनुदानाची मागणी : मार्च महिन्यात बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेले क्षेत्र, जिरायती क्षेत्राचे एकूण क्षेत्र 1129.61, बागायती क्षेत्र सतराशे 69 पॉईंट 51 हेक्टर तर फळ पिकांचे 902.90 हेक्टर एकूण 3802.2 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्यामध्ये जिरायती क्षेत्राचे शेतकऱ्यांची संख्या 2725 तर बागायती शेतकऱ्यांची संख्या 3800, फळ पिक असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 1974 असे एकूण सात हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तर प्रशासनाकडून प्रतिहेक्टर अनुदान जिरायतीसाठी आठ हजार पाचशे रुपये तर बागायतीसाठी 17 हजार रुपये, तर फळ पिकासाठी 22 हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर अनुदानाची मागणी केली आहे. एकूण 5 कोटी 99 लाख 98 हजार 605 रुपयाची मागणी शासन दरबारी केली आहे.
हेही वाचा : Eknath Shinde Meeting on Weather : अवकाळी, गारपीटामुळे झालेल्या नुकसानीचे मुख्यमंत्री आज घेणार आढावा बैठक