बीड -जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. साद जिकरिया पाशा शेख असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
बीडमध्ये अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; एकास अटक - Bead Crime News
बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नेकनूर परिसरात दुपारच्या वेळी खेळायला घेऊन जाण्याच्या निमित्ताने आरोपीने एका अल्पवयीन मुलाला सायकलवरून मांजरसुंभा येथून कपिलधार रोडवरील निर्जन परिसरात नेऊन अनैसर्गिक कृत्य केले. हा प्रकार परिसरातील एका व्यक्तीने पाहिला. त्याला पाहताच आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
पीडित मुलाने पालकांना याबाबत माहिती दिली. मुलाच्या मामाने दिलेल्या फिर्यादीवरुन नेकनूर पोलीस ठाण्यात आनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.