महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परळीत विनापरवाना गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याला अटक - बीड जीवंत काडतुसे न्यूज

गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे व मॅगझीन बाळगणाऱ्याला परळी पोलिसांनी अटक केली आहे. परळी शहर डी बी पथकाचे भास्कर केंद्रे यांना याबाबतची माहिती मिळाली. यानंतर सापळा रचून संबंधिताला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे व मॅगझीन जप्त करण्यात आले.

beed
beed

By

Published : Jun 17, 2021, 10:09 PM IST

परळी (बीड) - गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे व मॅगझीन बाळगणाऱ्याला परळी पोलिसांनी अटक केली आहे. परळी शहर डी बी पथकाचे भास्कर केंद्रे यांना याबाबतची माहिती मिळाली. यानंतर सापळा रचून संबंधिताला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे व मॅगझीन जप्त करण्यात आले.

शस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याने गुन्हा दाखल

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास परळी येथील नाथ टॉकिजसमोर एक व्यक्ती थांबला आहे. त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्याने त्यांचे नाव अशोक मधुकर मुंडे (34 वर्षे, रा. पांगरी. ता. परळी वैजनाथ. जि. बीड) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला आतून ठेवलेला एक गावठी पिस्टल, मॅगझीन व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचे कोणतेही लायसन्स नव्हते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध तुकाराम मुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस स्टेशन नंबर 93/2021कलम 3/25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला.

ही कार्यवाही परळी शहरचे पोलीस निरिक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे भास्कर केंद्रे, शंकर बुड्डे, तुकाराम मुरकुटे, सचिन सानप यांनी केली. पुढील तपास पोलीस जमादार दिगांबर चट्टे करत आहेत.

हेही वाचा -मनसुख हिरेन हत्या प्रकरण : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details