महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळात तेरावा; गावकऱयांची तहान भागवणाऱ्या विहिरीत अज्ञात व्यक्तीने कालवले विष

बुधवारी मध्यरात्री एका अज्ञाताने विहिरीच्या पाण्यात दोन डब्बे किटक नाशक द्रव टाकले. विहिरीवरील विद्युत पंपाच्या वॉलमध्येही त्याने किटक नाशक टाकले. गुरुवारी सकाळी ग्रामस्थ पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर या किटकनाशक द्रव्याची दुर्गंधी सुटली होती. याची माहिती झाल्यानंतर विहिरीचे मालक रावसाहेब शिंदे यांनी गेवराई पोलिसांना दिली.

गावकऱयांची तहान भागवणाऱ्या विहीरीत अज्ञात व्यक्तीने कालवले वीष

By

Published : Jul 19, 2019, 12:11 AM IST

बीड -राज्यातील काही भागांमध्ये पावसाळा संपत आला तरी पाऊस येण्याचे चिन्ह दिसत नाही. त्यातच गेवराई तालुक्यातील भोजगावमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. अज्ञात व्यक्तीने गावकऱ्यांची तहान भागवणाऱ्या विहिरीतच विष कालवले आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

गावकऱयांची तहान भागवणाऱ्या विहीरीत अज्ञात व्यक्तीने कालवले वीष

गावासह आजुबाजुच्या वस्ती आणि तांड्यांवरील ग्रामस्थांची तहान भागविणाऱ्या विहिरीत अज्ञाताने विष कालवल्याची घटना गुरुवारी (१८ जुलै) भोजगावमध्ये उघड झाली. दरम्यान, यामुळे ग्रामस्थांची अवस्था दुष्काळात तेरावा अशीच झाली आहे.

मागच्या वर्षीचा दुष्काळ आणि यंदाही पावसाने ओढ दिल्याने अद्याप पाणी टंचाईच्या झळा कमी झालेल्या नाहीत. दरम्यान, भोजगाव येथील रावसाहेब शिंदे यांच्या विहिरीला पाणी असल्याने ग्रामस्थांना ही विहिर मोठा आधार ठरली आहे. शिंदे यांनी देखील दुष्काळात ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करुन दिले. परिसरातील वस्त्या आणि तांड्यांची तहान देखील याच विहीरीवरुन भागवली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या विहिरीचे अधिग्रहण केले होते. भर उन्हाळ्यात आजपावेतो विहिरीतून टँकर भरले जातात आणि त्या टँकरमधून वाडी, वस्ती, तांड्यावरील लोकांची तहान भागवली जाते.

दरम्यान, बुधवारच्या मध्यरात्री एका अज्ञाताने विहिरीच्या पाण्यात दोन डबे किटक नाशक द्रव टाकले. विहिरीवरील विद्युत पंपाच्या वॉलमध्येही त्याने किटकनाशक टाकले. गुरुवारी सकाळी ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी गेल्यानंतर या किटकनाशक द्रव्याची दुर्गंधी सुटली होती. याची माहिती झाल्यानंतर रावसाहेब शिंदे यांनी गेवराई पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून विहिरीतील पाण्याची नमुने तपासण्यासाठी हस्तगत केले आहेत.

भोजगाव आणि परिसरातील तहान भागविणाऱ्या या विहिरीच्या पाण्यात विष कालवले गेल्याने ग्रामस्थांवर पुन्हा भटकंतीची वेळ आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details