महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Suicide On Mountain : 400 फूट उंच डोंगरावर गळफास घेत अज्ञाताची आत्महत्या; महिनाभरात तिसरी घटना - अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला

धारुर तालुक्यात पुन्हा अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून (unknown person deadbody found) आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील चोरांबा येथील चारशे फूट उंच डोंगरावर (hanging himself on 400 feet high mountain) अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या (unknown person committed suicide by hanging) केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. Beed Crime, latest news from Beed

Suicide On Mountain
गळफास घेत अज्ञात इसमाची आत्महत्या

By

Published : Nov 15, 2022, 5:07 PM IST

बीड : धारुर तालुक्यात पुन्हा अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून (unknown person deadbody found) आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील चोरांबा येथील चारशे फूट उंच डोंगरावर (hanging himself on 400 feet high mountain) अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या (unknown person committed suicide by hanging) केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. थेटेगव्हाण येथील पोलीस पाटील यांच्या खबरीवरून धारूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. Beed Crime, latest news from Beed

झाडाला लटकलेला आढळला मृतदेह -धारुर तालुक्यातील चोरांबा, थेटेगव्हाण जवळ असलेल्या चारशे फूट उंच डोंगरावर एका लिंबाच्या झाडाला 40 ते 45 वय असलेल्या इसमाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सोमवारी गुरे चारणाऱ्या व्यक्तींना आढळून आला. चोरंबा येथील पोलीस पाटील यांना घटना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर धारूर पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची खबर देण्यात आली. संबंधित इसमाने आत्महत्या केल्याचा अंदाज लावला जात आहे.

सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह -आत्महत्या करणारी व्यक्ती ही अज्ञात असून मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी ही घटना घडलेली असल्याने पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत मृतदेह होता. कापडी गमजाच्या सहाय्याने लिंबाच्या फांदीला गळफास घेतल्याचे दिसून आले. भोगलवाडी येथील आरोग्य अधिकारी यांनी घटनास्थळी उत्तरीय तपासणी करून चोरंबा येथील गायरानामध्ये अंत्यविधी करण्यात आला. काही दिवसांपूर्वी धारुर घाटात व कारी शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असताना आज चोरांबा शिवारात मृतदेह आढळून आला. महिन्यातील ही तिसरी घटना आहे. वारंवार अशा घटना निदर्शनास येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details