महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देव तारी त्याला.. मोटारसायकलीची दोन्ही चाके अंगावरून जाऊनही चिमुकला सुखरूप - beed accident

देव तारी त्याला कोण मारी, ही उक्ती बीडमध्ये सत्यात उतरली आहे. रस्त्यावर धावत असताना एक चिमुकला एका दुचाकीच्या आडवा आला आणि दुचाकी थेट त्याच्या अंगावरून गेली. हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना बीडच्या मादळमोही गावात घडली. मात्र यात त्या चिमुकल्याला कसलीच इजा झाली नाही, हे विशेष म्हणावे लागेल.

Two-year-old child hit by motorcycle in Beed
Two-year-old child hit by motorcycle in Beed

By

Published : Apr 12, 2021, 4:32 PM IST

बीड -रस्त्यावर धावत असताना एक चिमुकला एका दुचाकीच्या आडवा आला आणि दुचाकी थेट त्याच्या अंगावरून गेली. हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना बीडच्या मादळमोही गावात घडली. मात्र यात त्या चिमुकल्याला कसलीच इजा झाली नाही, हे विशेष म्हणावे लागेल. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सध्या तो व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. आयुष भोपळे असे या अपघातातून बचावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

देव तारी त्याला कोण मारी, ही उक्ती बीडमध्ये सत्यात उतरली आहे. व्हिडिओत दिसणारा हा चिमुकला आहे मादळमोही गावच्या सुरेश भोपळे यांचा. आयुष भोपळे याचं वय अवघं दोन वर्ष आहे. दोन वर्षाच्या आयुषने काळावरही मात केलीय. 3 एप्रिलच्या सकाळी आयुष सोबत जी घटना घडली ती पाहून तुमच्याही अंगावर शहरे आल्याशिवाय राहणार नाहीत.

मोटारसायकलीची दोन्ही चाके अंगावरून जाऊनही चिमुकला सुखरूप
आयुष सकाळी आपल्या आजीसोबत नऊच्या सुमारास घराच्या बाहेर उभा होता आणि त्याचवेळी त्याला खाऊ आणण्यासाठी त्याच्या आजीने पैसे दिले. पैसे घेऊन त्याने दुकानात जाण्यासाठी धूम ठोकली आणि रस्ता ओलांडत असताना अचानक समोरून आलेल्या दुचाकीने त्याला जोराची धडक दिली. चक्क आयुषच्या अंगावरून दुचाकी गेली असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र कसलीच इजा झाली नसल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

हे ही वाचा - VIDEO : झाडावर वीज कोसळून लागली आग; कोल्हापुरातल्या वाठारमधील घटना

अंगावरून मोटारसायकलीची दोन्ही चाके जाऊनही या चिमुकल्याला कुठलीही मोठी दुखापत झाली नाही. एवढेच नाही तर मोटारसायकल अंगावरून गेल्यानंतर आयुष ताडकन उभा राहिला आणि त्यानंतर त्याला गावातल्याच एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला कुठलीही मोठी इजा झाली नसल्याचे सगितल्याचे आयुषची आई सुवर्णा भोपळे यांनी सांगितले.

आयुष सोबत घडलेल्या घटनेने हृदयाचा थरकाप उडवून देणारा आहे. मात्र म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी.. ही उक्ती आयुषच्या घटनेनंतर सत्यात उतरली असल्याचे आयुषचे वडिल सुरेश भोपळे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details