बीड :बीड जिल्ह्याच्या वेरूळ सावंगी गावात वीज पडून दोन महिलांसह दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. अवकाळी पावसाने राज्यात थैमान घातले असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या अवकाळी फळबागांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. आष्टी तालुक्यात सर्वदूर विजांच्या कडकडासह वादळ सुरू जोरदार अवकाळी पाऊस झाला. यात अनेक भागात नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याची माहिती मिळते आहे. मात्र, वेरुळ सावंगी गावात काजल विकास माळी (वय -23) रा.केरुळ तसेच राणी (ताई) संदीपान सावंत रा.सांगवी आष्टी (वय 35) यांचा अंगावर वीज पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दोघीही माहेरी हिंगणी येथे वडिलांकडे गेल्या असताना त्यांच्या अंगावर वीज पडल्याच्या झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. तसेच पारगाव जो. येथील युवराज नवनाथ भोराडे यांची बैलजोडी, तसेच शिरुर का. तालुक्यातील भडखेल येथील शेतकरी मधुकर आहेर यांचा एक बैल वीज पडुन मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Lightning in Ashti :आष्टी तालुक्यात पावसाचा कहर; वीज पडून दोन महिलांचा मृत्यू - Two women Died Due To Lightning
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसामुळे बीडच्या केरूळ सांवगी गावात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन बैलांना देखील प्राण गमावे लागले आहे. या पावसामुळे आष्टी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची पीके जमिनदोस्त झाली आहेत. तसेच अवकाळीचा फळबागानाही फटका बसला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
नाशिक : जिल्ह्याला 7 ते 17 एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला. त्यामुळे पंधरा तालुक्यातील 780 गावे बाधित झाली आहेत. सुमारे ६६ हजार ९२३ शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. गारपिटीसह मुसळधार पावसाने नुकसानीत आणखी भर टाकली. एप्रिल हा कडक उन्हाळा असतो. मात्र, यंदा दोन आठवडे अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. जिल्ह्यात गेल्या ४५ दिवसांत ४१ मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांमध्ये या कालावधीत पाऊस झाला. त्यामुळे ३७ हजार ९८१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 30 हजार 256 हेक्टर क्षेत्रावरील कांद्याची लागवड चिखल झाली. याशिवाय २ हजार ६४५ हेक्टरवरील द्राक्षबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. १ हजार ७१५ हेक्टरवरील पाले व फळपिकांचेही नुकसान झाले आहे. सटाणा-बागलाण तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, अवकाळी पावसामुळे २३ हजार ४२२ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. या तालुक्यातील १५२ गावांतील ३४ हजार ६४५ शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.