महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये विहिरीत आढळले दोन सख्ख्या बहिणीचे मृतदेह; पोलीस तपास सुरु - विहिरीत आढळले दोन बहिणीचे मृतदेह

मैत्रीणीचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळून आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दोन सख्ख्या बहिणीचे मृतदेह
दोन सख्ख्या बहिणीचे मृतदेह

By

Published : Feb 5, 2022, 1:07 AM IST

बीड -मैत्रीणीचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळून आले आहे. सानिया अल्ताफ शेख ( वय, 18 ), आणि निदा अल्ताफ शेख ( वय, 16 ) अशी मृत्यू झालेल्या दोघींचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र ही हत्या आहे की आत्महत्या असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहे.

शहरातील फ्लावर्स काँटर भागात राहणार अल्ताफ शेख यांना तीन मुली व एक मुलगा आहे. यांची मुकूंदराज महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिक्षण घेणारी मोठी मुलगी सानिया अल्ताफ शेख (18 ) निदा अल्ताफ शेख ( 16 ) या दोघी सख्या बहिणी मैत्रीणीचा वाढदिवस आहे म्हणून वडिलांनी सकाळी यशवंतराव चव्हाण चौक मोरेवाडी येथे सोडून आले. दुपारी चार वाजता स्वाराती दवाखाना रोडवरील कंपनीबाग परिसरातील गेट की बावडी या विहिरीच्या कठड्यावर बऱ्याच वेळापासून बँग ठेवलेली शेळ्या चारणाऱ्या मुलाला दिसली. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते जहांगीर पठाण यांना समजली फ्लावर्स काँटर भागात माहिती मिळाली. कुटूंबीय आल्यानंतर विहिरीत शोध घेतला असता दोन्ही सख्या बहिणीचे मृतदेह आढळले आहेत. पोलिसांनी मृतदेह स्वारातीच्या शवविच्छेदन विभागात पाठवले आहे. मात्र सख्या बहिणींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याने शेख कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. असे असले तरी ही हत्या आहे की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

हेही वाचा -Online Payment Fraud : एक-एक रुपये पाठवून 30 लाखांचा गंडा घालणारा 'हायटेक नटवरलाल' अटकेत

ABOUT THE AUTHOR

...view details