बीड -बीडहून बारामतीकडे जात असलेल्या एसटी बस व दुचाकीची जोरदार धडक झाली. पुण्याहून बीडकडे येत असलेले दुचाकीवरून येत असलेले दोघे जण जागीच ठार झाले आहेत. ही घटना बीडपासून जवळच असलेल्या चऱ्हाटा फाटा येथे बुधवारी रात्री आठ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित बडे घटनास्थळी पोहोचले.
हेही वाचा - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीवर छापे; चार लाखांची दारू जप्त
राजेश वसंत घुंबरे (वय- 29) हा गाडे पिंपळगाव तालुका परळी येथील रहिवासी होता तर कुलदीप सदाशिव ठोके (वय-28) हा सुद्धा त्याच गावातील रहिवासी होता. या दोघा दुचाकीस्वाराचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. राजेश आणि कुलदीप हे दोघेही पुणे येथे एका खाजगी कंपनीत कार्यरत होते. राजेश याचे चुलते सुखदेव घुंबरे यांचा एक दिवसापूर्वीच मृत्यू झाल्याने त्याची राख सावडण्यासाठी दोघेही पुण्यावरून दुचाकीवर (गाडी क्र. एमच 43 टी 4542) गाडे पिंपळगावकडे येत होते.
बीड जवळ चऱ्हाटा फाटा येथे आल्यानंतर बीडकडून बारामतीकडे जात असलेली बीड-बारामती या एसटी बसला दुचाकीची जोरदार धडक बसली. (बस क्रमांक - एमएच 40 एन 9176) या भीषण अपघातात दुचाकीवरील राजेश व कुलदीप जागीच ठार झाले.
हेही वाचा - पैशाच्या वादातून मित्राची कोयत्याने गळा चिरून हत्या; आरोपी पोलीस ठाण्यात हजर