महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑक्सिजन बंद झाल्याने बीडमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू; पंकजा मुंडे यांची चौकशीची मागणी - बीड कोरोना बातम्या

जिल्हा प्रशासनाने देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगून पंकजा मुंडे यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, याची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

परळी
परळी

By

Published : Apr 25, 2021, 10:16 PM IST

परळी (बीड) -अचानक ऑक्सिजन बंद झाल्याने दोन रुग्णांचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे, या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.

आज पहाटे जिल्हा रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक 7 मध्ये पाॅझिटिव्ह असलेले दोन रुग्ण दगावल्याची घटना घडली. अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून रुग्णालयाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने समोर आला आहे. जिल्हा प्रशासनाने देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगून पंकजा मुंडे यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, याची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details