बीड - जिल्ह्यात मागील दोन दिवसामध्ये 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एका होम क्वारंटाईन असलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या गेवराई तालुक्यातील त्या युवकाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोनशेच्या पुढे गेली आहे. 117 हून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत चालला असून, दोन दिवसात बीड जिल्ह्यातील दोघांचा उपचारा दरम्यान विविध ठिकाणी मृत्यू झाला आहे. तर क्वारंटाईन असलेल्या एका युवकाने कोरोना अहवाल येण्यापूर्वीच आत्महत्या केली. जिल्ह्यातील कोरोना रग्ण संख्येची एकूण संख्या 200 पेक्षा जास्त झाली आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा देखील शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यातच मागच्या दोन दिवसात दोन कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे.
बीडमध्ये दोघांचा कोरोनामुळे मृत्यू ; क्वारंटाईन असताना एका युवकाची आत्महत्या - beed corona update
पाटोदा तालुक्यातील येवलवाडी व बेनसूर येथील प्रत्येकी एक रुग्ण पुणे येथील रुग्णालयात दगावले. तर गेवराई तालुक्यातील उमापूर येथील युवकाने होम क्वारंटाईन असतानाच आत्महत्या केली. बळी गेलेल्या रुग्णांना कर्करोग, न्युमोनिया आणि इतर आजार होते अशी माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.
पाटोदा तालुक्यातील येवलवाडी व बेनसूर येथील प्रत्येकी एक रुग्ण पुणे येथील रुग्णालयात दगावले. तर गेवराई तालुक्यातील उमापूर येथील युवकाने होम क्वारंटाईन असतानाच आत्महत्या केली. बळी गेलेल्या रुग्णांना कर्करोग, न्युमोनिया आणि इतर आजार होते अशी माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. दरम्यान चकलांबा येथील एका तरुणाला क्वारंटाईन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी उशीरा त्याने कोरोनाच्या भीतीने क्वारंटाईन सेंटरमध्ये आत्महत्या केली.
आज घडीला बीड जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या 9 झाली आहे.