बीड - तालुक्यातील हिवरगव्हण येथे मित्राला मोटर सायकलवर सोडून आपल्या उपळी गावाकडे येत असताना बाबी फाट्याजवळ एसटीने एका दुचाकीला उडवले. या अपघातात दोन्ही तरुण जागीच ठार झाले आहेत. ही घटना वडवणी तालुक्यातील बाबी फाट्याजवळ शुक्रवारी घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
एसटी-दुचाकीच्या अपघातात दोन ठार; वडवणी तालुक्यातील घटना - bus accident in beed
तालुक्यातील हिवरगव्हण येथे मित्राला मोटर सायकलवर सोडून आपल्या उपळी गावाकडे येत असताना बाबी फाट्याजवळ एसटीने एका दुचाकीला उडवले. या अपघातात दोन्ही तरुण जागीच ठार झाले आहेत. ही घटना वडवणी तालुक्यातील बाबी फाट्याजवळ शुक्रवारी घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
वडवणी तालुक्यातील उपळी येथील तरुण ऋषिकेश राजू शेळके (वय 23 वर्षे), ओमप्रकाश श्रीमंत राऊत (वय 26 वर्ष) हे मोटरसायकलवर हिवरगव्हाण येथील मित्राला सोडून गावी उपळीला येत होते. यावेळी बाबी फाट्याजवळ असणार्या गतिरोधकाजवळ पाठीमागून येणार्या परभणी आगाराच्या एसटीबस चालकाचा ताबा सुटल्याने त्याने दुचाकीला धडक दिली. यामध्ये ऋषिकेश आणि ओमप्रकाश या दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती वडवणी पोलिसांना कळतात उपळी बीट अंमलदार नवनाथ ढाकणे यांनी या घटनास्थळाकडे तात्काळ धाव घेतली होती. एकाच गावातील तरुण अपघातात गेल्याने गावावर शोककळा पसरली आहे.