महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी - बीड जिल्हा बातमी

धुळे-सोलापूर महामार्गावरील आरटीओ कार्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

अपघातग्रस्त वाहन
अपघातग्रस्त वाहन

By

Published : Jun 27, 2021, 4:56 AM IST

बीड- धुळे- सोलापूर महामार्गावर आरटीओ कार्यालयाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. 26 जून) पहाटे घडली आहे. तुकाराम सूर्यभान जगताप (वय 47 वर्षे, रा.भवानवाडी), दत्ताभाऊ भानुदास शिंदे (वय 28 वर्षे रा.भवानवाडी), असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, तुकाराम व दत्ताभाऊ हे दुचाकी (क्र. एम.एच. 23 बी.ए.2898) वरून नामलगावकडून बीडकडे विरुद्ध दिशेने येत होते. दरम्यान महामार्ग पोलीस म्हणून कार्यरत असलेले अजय जाधव हे बीडवरून गेवराईकडे (एम.एच. 23 एएम 2214) दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरटीओ कार्यालयाजवळ दोन्ही दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. यात तुकाराम जगताप आणि दत्ताभाऊ शिंदे यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवर असलेले पोलीस अजय जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत दोघांचे शवविच्छेदन शनिवारी दुपारी उशिरा करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, बिट अंमलदार उद्धव जरे यांनी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला.

हेही वाचा -बीडमध्ये विवाहितेची हत्या झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details