बीड -पाथरीकडून माजलगावकडे येणाऱ्या एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात एका मोटरसायकलने समोरून येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले आहेत तर दोन जण याठिकाणी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दुघड पेट्रोल पंपासमोर महामार्ग 222 वर पाथरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवार रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान घडली.
बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात मोटरसायकलची समोरासमोर धडक; दोन ठार - माजलगाव अपघात बातमी
पाथरीकडून माजलगावकडे येणाऱ्या एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात एका मोटरसायकलने समोरून येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथरी येथून माजलगाव कडे येत असलेल्या बसच्या पाठीमागे वडवणी तालुक्यातील देवगाव येथील 25 वर्षीय युवक सुरवसे अतुल आनंद एकटाच येत होता . यावेळी माजलगाव शहराजवळ राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या दुगड पंपाजवळ एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या मोटर सायकला त्याने जोराची धडक दिली.यावेळी झालेल्या अपघातात दोन्ही मोटारसायकल चालक ठार झाले आहेत. समोरून येणाऱ्या मोटारसायकल चालकाचे नाव झेटे गणेश गुलाब( वय 22 वर्ष) असून तो घळाटवाडी येथील रहिवासी आहे. तो या अपघातात मृत्यू झाला आहे.
त्याच गावातील बहिण-भाऊ पांडुरंग विष्णु शिंदे( वय 22 वर्षे)व कविता सूर्यकांत नरवडे (वय 25 वर्षे) हे सोबत गाडीवर येत होते.ते या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींना बीड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.