बीड-औरंगाबादवरून गेवराईकडे येणाऱ्या टेम्पोने गेवराई जवळील बागपिंपळगावजवळ दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली.
बाबासाहेब सौंदलकर (वय 50) व गोरख लिंबाजी शेंडगे (वय 45) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही रा.विठ्ठलनगर (रेवकी) ता. गेवराई जि. बीड येथील रहिवासी आहेत. याबाबत माहिती अशी की, बाबासाहेब सौंदलकर व गोरख लिंबाजी शेंडगे हे आपल्या दुचाकीवरून विठ्ठलनगर (रेवकी) याठिकाणी जात होते. धुळे-सोलापूर महामार्गावर औरंगाबादहून गेवराईकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीचे मोठे नुकसान झाले. तर दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. ही घटना बागपिंपळगाव कँम्प या ठिकाणी घडली.
भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; दोन जागीच ठार - two wheeler tempo accident in Beed
बाबासाहेब सौंदलकर (वय 50) व गोरख लिंबाजी शेंडगे (वय 45) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही रा.विठ्ठलनगर (रेवकी) ता. गेवराई जि. बीड येथील रहिवासी आहेत.
संग्रहित
घटनेनंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच महामार्ग तसेच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती.
हेही वाचा-आजपासून नाशिक बेळगाव विमानसेवा सुरू