बीड - सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर (2 Brother raped minor sister)अत्याचार केल्याची घटना बीड तालुक्यात घडली आहे. पीडिता गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला.
येथील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या भावाने आणि चुलत भावाने बलात्कार ( 2 Brother raped minor sister ) केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित आरोपी भाऊ बऱ्याच दिवसांपासून आपल्या बहिणीचे लैंगिक शोषण करत होते. दरम्यान पीडित मुलीचे पोट दुखू लागल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी पीडित मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे.
नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी एकास अटक केली आहे. यापूर्वी बीड जिल्हयातील अंबाजोगाई शहरात एका अल्पवयीन मुलीवर 400 जणांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेला आठवडा उलटतो की नाही तोच दूसरी अत्याचाराची घटना समोर आल्याने महिला व मुली च्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
घटनास्थळी उपअधीक्षक संतोष वाळके, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी भेट दिली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार राजपूत हे करत आहेत. इतर दोन आरोपींचा ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत. सख्ख्या भावासह, चुलत भाऊ व अन्य एका आरोपीवर कलम 376 (2) (I) (N) (F),354 (अ) 34 भादवि सह (N) 3, 8, 12 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.
हेही वाचा - धक्कादायक: अल्पवयीन मुलीवर ६ महिन्यांत पोलिसासह ४०० हून अधिकांनी केला बलात्कार, ४ आरोपी ताब्यात