महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये शेततळ्यात पाय घसरून दोन सख्ख्या भावाचा मृत्यू - two brothers drown in farming tank at Mslshirasmarg beed

विकास आणि गणेश दोघेही आज दुपारी आपल्या स्वत:च्या शेतातील शेततळे पाहण्याठी गेले होते. शेततळ्याभवती फिरत असताना अचानक पाय घसरून दोघेही पाण्यात पडले. यावेळी आजुबाजुला परिसरात कोणी नव्हते. त्यामुळे त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला.

बीडमध्ये शेततळ्यावर पाय घसरून दोन सख्ख्या भावाचा मृत्यू

By

Published : Oct 30, 2019, 7:24 PM IST

बीड - गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने, सख्ख्या भावाचा मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवार) दुपारच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे शिरसमार्ग गावावर शोककळा पसरली आहे. विकास सुदाम ठोंबरे (वय २३) आणि गणेश सुदाम ठोंबरे (वय २१) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

विकास आणि गणेश दोघेही आज दुपारी आपल्या स्वत:च्या शेतातील शेततळे पाहण्याठी गेले होते. शेततळ्याभवती फिरत असताना अचानक पाय घसरून दोघेही पाण्यात पडले. यावेळी आजुबाजुला परिसरात कोणी नव्हते. त्यामुळे त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मादळमोही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. विकास ठोंबरे याचा वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. तर गणेश हा अविवाहित होता.

हेही वाचा -पंकजा मुंडे आता विधान परिषदेवर जाणार का? चर्चांना उधान

हेही वाचा -संसाराचा गाडा ओढायचा की, उचल फेडायची? ऊसतोड मजुरांची व्यथा

ABOUT THE AUTHOR

...view details