महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाण्याची टाकी अंगावर पडून दोन भावांचा मृत्यू; वडवणी येथील घटना

गाडीच्या बैलगाडी भोवती जयदेव व अविष्कार खेळत होते. खेळता-खेळता जयदेव व अविष्कार यांनी बैलगाडीला पाठीमागच्या बाजूला खेळत होते. त्यावेळेला बैलगाडीवरील पाचशे लिटरचे बॅरल (टाकी) अंगावर पडून दोन्ही भावंडांचा जागीच मृत्यू झाला.

पाण्याचे टँकर अंगावर पडून दोन भावांचा मृत्यू

By

Published : Apr 2, 2019, 9:12 AM IST

बीड- घरासमोर असलेल्या बैलगाडीतील पाण्याची टाकी अंगावर पडून दोन भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचाळी येथे घडली आहे. जयदेव बळीराम राठोड (वय ७) आणि आविष्कार राठोड (वय ५) असे त्या मृत भावाची नावे आहेत. या घटनेमध्ये दोन लहान भावंडांचा मृत्यू झाल्याने सबंध तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकप्रकारे पाणीटंचाईचा बळी ही दोन्हीभावंडे गेले असल्याचा रोष बीड जिल्ह्यात व्यक्त केला जात आहे.


बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे. यामुळे शेतकरी शेतातून बैलगाडीमध्ये टाकीत पाणी भरून आणून घरासमोर ठेवतात. याप्रमाणेच सोमवारी बळीराम राठोड यांनी शेतातून पाचशे लिटरची टाकी भरून बैलगाडी घरासमोर सोडली व बैल बांधण्यासाठी गोठ्यात गेले. गाडीच्या बैलगाडी भोवती जयदेव व अविष्कार खेळत होते. खेळता-खेळता जयदेव व अविष्कार यांनी बैलगाडीजवळ खेळत होते. यावेळीबैलगाडीवरीलपाचशे लिटरचे बॅरल (टाकी) अंगावर पडून दोन्ही भावंडांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये गंभीर म्हणजे बळीराम राठोड यांना दोन दोनच अपत्ये होती. या घटनेमुळे वडवणी तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. जयदेव व अविष्कारचा बळी हा पाणीटंचाईचा बळी असल्याचा रोष वडवणी तालुक्यात नागरीक व्यक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details