बीड -अखेर रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचे समोर आले आहे. चक्क 22 हजार रूपयांना रेमडेसिवीर विक्री करताना दोन तरूणांना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी रात्री उशीरा केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड : रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकणाऱ्या दोघांना रंगेहात अटक - Remdesivir black market beed news
श्रेयस बाबासाहेब नाईकवाडे (ता.धारूर) व कृष्णा ठोंबरे (रा.दहिफळ ता.केज) अशी पकडलेल्या तरूणांची नावे आहेत.
श्रेयस बाबासाहेब नाईकवाडे (ता.धारूर) व कृष्णा ठोंबरे (रा.दहिफळ ता.केज) अशी पकडलेल्या तरूणांची नावे आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने एका रूग्णाच्या नातेवाईकास एका मेडिकल चालकाने इंजेक्शन मिळत असल्याचे सांगितले. यावरून सबंधित रूग्ण नातेवाईक यांनी त्या मेडिकल वर चौकशी केली असता तब्बल 22 हजार रूपये इंजेक्शनची किंमत सांगितली.
याच दरम्यान, रेमडेसिविर काळ्या बाजारात देताना शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, पोलीस कर्मचारी संघर्ष गोरे यांनी नाईकवाडे आणि ठोंबरे या दोन्ही तरूणांना पकडले. याप्रकरणी त्या दोघांवरही शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.