अंबाजोगाई (बीड)- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्या लाटेचे गंभीर परिणाम आता राज्यातच नव्हे, तर देशभरात दिसून येत आहे. अनेक भागातून स्मशानातले भयावह फोटो वस्तूस्थिती दाखवून देत आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात गेल्या दोन दिवसांमध्ये २३ बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. शुक्रवारी दिवसभरात १२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर आज दुपारी १२ वाजेपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आणखी ९ मृतदेह शवगृहात आहेत.
अंबाजोगाईत दोन दिवसात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार! - मृतदेहांवर अंत्यसंस्कार!
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात गेल्या दोन दिवसांमध्ये २३ बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. शुक्रवारी दिवसभरात १२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर आज दुपारी १२ वाजेपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आणखी ९ मृतदेह शवगृहात आहेत.
आज दिवसभरात 11 मृतदेहांवर अंत्यसंस्कार!
कोरोनाच्या संसर्गाने बीड जिल्ह्याला विळख्यात घेतले आहे. त्यात अंबाजोगाई स्वामीरामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्या लाटेचे गंभीर परिणाम आता समोर येत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नगर, उस्मानाबाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांचे मृत्यू होताना दिसून येत असतानाच अंबाजोगाईतही मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. गेल्या ४८ तासात २३ कोरोनाबाधित मृतदेहांवर अंबाजोगाईत अंत्यसंस्कार होत आहेत. शुक्रवारी दिवसभरात १२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज दुपारी १२ वाजता दोन मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानात नेण्यात आले होते. तर आणखी नऊ मृतदेह शवगृहात असल्याची माहिती आहे. शववाहतुकीसाठी असलेल्या रुग्णवाहिकेमध्ये दोन मृतदेह एकाच वेळी स्मशानात नेण्यात येत असतात. आज दिवसभरात अकरा मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
हेही वाचा -मेळघाटात कोरोना उपचारासाठी भूमकाकडे गेलेल्या महिलेचा मृत्यू