आष्टी (बीड)- नगर-बीड महामार्गावर कडा येथील कर्डिले वस्तीजवळ सोमवारी (दि. 18 जाने.) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वऱ्हाडाची बस उलटून झालेल्या अपघातात वीस जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
वऱ्हाडाची बस उलटून वीस प्रवासी जखमी - beed breaking news
नगर-बीड महामार्गावर कडा येथील कर्डिले वस्तीजवळ लग्नाच्या वऱ्हाडाची बस उलटून अपघात झाला आहे. यात वीस जण जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कल्याण येथून जामखेड तालुक्यातील पिंपळगाव येथे लग्नासाठी खासगी बस (एमएच O5 डी के 6125) मधून आले होते. सोमवारी (दि. 18 जाने.) दुपारचा लग्नाचा कार्यक्रम उरकून परत कल्याणकडे जात होते. त्यावेळी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बस उलटली. जखमींना ग्रामस्थांनी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले. जखमींवर कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. जखमीमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे. अपघातानंतर काहीवेळ महामार्गवर वाहतूक ठप्प होती.
हेही वाचा -आष्टी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर, श्रेय घेण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा