महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मजूर, उद्योजक, व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या - पंकजा मुंडे - पंकजा मुंडे

कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच लाॅकडाऊनमुळे गरिबांची, व्यापाऱ्यांची, आर्थिक परिस्थिती कठीण होऊ नये, यावर पर्याय काय? अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

पंकजा मुंडे
पंकजा मुंडे

By

Published : Apr 11, 2021, 10:13 AM IST

परळी वैजनाथ - कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे, त्यामुळे प्रत्येकाला त्रास सहन करावा लागत आहे. लाॅकडाऊनमुळे गरिबांची, व्यापाऱ्यांची व इतर सर्वांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होईल. त्यासाठी मजूर, व्यापारी, उद्योजक, नोकरदारांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणेवर आलेला भार गांभीर्याने घेण्याची गरज आहे असे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
करोनाची साखळी कशी तोडणार? - पंकजा मुंडे
कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ही लाट रोखण्यासाठी लाॅकडाऊन केले जात आहे. मात्र, लाॅकडाऊनमुळे कोरोना थांबणार आहे का? असे अनेक प्रश्न पडत आहेत. यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लाॅकडाऊनमुळे गरिबांची, व्यापाऱ्यांची, आर्थिक परिस्थिती कठीण होईल. तर यावर पर्याय काय आहे? कोरोनाची साखळी कशी तोडणार? असेही पंकजा यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details