बीड : सोलापूरचा नवरदेव मोर्चा गाजत असताना बीड जिल्ह्यामध्ये ( True Story of Fake Marriage ) लग्नाळू पोरांना फसवून, बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बीड पोलिसांना यश आले ( Fake Marriage Gang Busted ) आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या टोळीने अनेकांना लाखों रुपयांचा गंडा घातला ( Fake Marriage Gang Network Across Maharashtra ) आहे. याच लग्नातील आई, भाऊ बनावट नाते असल्याची माहिती उजेडात आले आहे. त्यामुळे लग्न करताय, मग जरा सोयरीक तपासून पाहा? असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. पाहुयात खोट्या लग्नाची खरी गोष्ट, नेमकी काय आहे? या विषयीचा एक Etv Bharat चा स्पेशल रिपोर्ट....
नव्या नवरीने पंधरा दिवसांमध्ये दागिन्यांसह धूम ठोकलीबीड जिल्ह्यात गेल्या लग्न करून आलेल्या नव्या नवरीने पंधरा दिवसांमध्ये दागिन्यांसह धूम ठोकल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाणे आणि नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बीडसह संपूर्ण महाराष्ट्रात लग्नाळू पोरांना फसवणारी टोळी कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर हा तपास करताना अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आधार कार्ड बनावट, नातेही बनावट, आई-वडील आणि भाऊ हेदेखील बनावट, तर एजंटमार्फत हा सर्व लुटीचा खेळ चालायचा एवढे मोठे फ्राॅड पोलिसांनी उघड केले आहे.
अडीच लाख रुपये देऊन लग्न लावून मोठ्या हौसेने आणलेली नवरी करवलीसह गायबअडीच लाख रुपये देऊन लग्न लावून मोठ्या हौसेने आणलेली नवरी करवलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात नवरदेवाने पकडून बीड शहर पोलिसांच्या स्वाधीन केली होती. यानंतर बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. बीड जिल्ह्यात 8 दिवसात दोन बनावट लग्नाच्या घटना समोर आल्याने मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता पोलिसानी व्यक्त केली. या प्रकरणात बीड शहर पोलिस ठाण्यात नवरी सह 7 जणांना अटक केली.नवरी अल्पवयीन निघाली असून, लग्नातील आई, भाऊ बनावट असल्याची माहिती उजेडात आली आहे.