बीड- ब्रेक निकामी झाल्याने मालवाहू ट्रक धारूरच्या घाटातील दरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी(दि.29 नोव्हेंबर)ला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. प्रसंगावधान दाखवत चालकाने गाडीतून उडी मारल्याने तो बचावला आहे.
ब्रेक निकामी झाल्याने धारूर घाटात ट्रक कोसळला; चालकाने उडी मारल्याने बचावला - बीडमध्ये ट्रक दरीत कोसळला
ब्रेक निकामी झाल्याने मालवाहू ट्रक धारूरच्या घाटातील दरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी(दि.29 नोव्हेंबर)ला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. प्रसंगावधान दाखवत चालकाने गाडीतून उडी मारल्याने तो बचावला आहे.
![ब्रेक निकामी झाल्याने धारूर घाटात ट्रक कोसळला; चालकाने उडी मारल्याने बचावला truck fall in dharur valley due to break fail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5220081-thumbnail-3x2-truck.jpg)
ब्रेक निकामी झाल्याने धारूर घाटात ट्रक कोसळला
माजलगाव येथून सोलापूरला सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक धारूर घाटात ब्रेक निकामी झाल्याने घाटातील कठड्यावर आदळला. यामुळे कठडा तुटून हा ट्रक 150 फूट दरीत कोसळला. यावेळी चालक रफिक याने प्रसंगावधान दाखवून उडी मारल्याने तो या अपघातातून बचावला आहे.
ट्रकमध्ये 22 टन सोयाबीन असल्याने वळणार ट्रकचे संतुलन बिघडले; आणि संबंधित प्रकार घडल्याचे समोर येत आहे.