महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धारूरच्या घाटामध्ये रविवारी पहाटे खताची पोते घेऊन जाणारा ट्रक उलटला - धारूरच्या घाटामध्ये ट्रक झाला पलटी

धारूरच्या घाटामध्ये रविवारी पहाटे खताची पोते घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. या घाटाचे रुंदीकरण करून त्वरीत अपघाताची मालिका थांबवावी, अशी मागणी होत आहे.

truck carrying bags of manure overturned in Dharur Ghat on Sunday morning
धारूरच्या घाटामध्ये रविवारी पहाटे खताची पोते घेऊन जाणारा ट्रक झाला पलटी

By

Published : Jun 21, 2021, 10:59 AM IST

किल्ले धारूर -बीड जिल्ह्यातील धारूरच्या घाटामध्ये रविवारी पहाटे खताची पोते घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. या अपघातात ड्रायव्हर व क्लीनर गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे तीनच्या दरम्यान उस्मानाबादकडून माजलगावकडे खताची पोती घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक एम एच 25 यू 0301) घाटातील अरुंद रस्त्यामुळे अवघड वळणावर पलटी झाला आहे. रोजच्या अपघातामुळे या घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये मात्र भीती निर्माण होत आहे.

धारूर येथील घाटामध्ये अरूंद रस्त्यामुळे दररोज अपघात होण्याची मालिका सुरू आहे. उस्मानाबादहून माजलगावकडे खताची पोती घेऊन जाणारा ट्रक अवघड वाळणावर पलटी झाल्याने खताची पोती खाली पडली होती, यामुळे ट्रकचे तसेच खताच्या पोत्यांचे नुकसान झाले आहे. दररोज होणाऱ्या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. जीव मुठीत धरून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे. धारूरचा घाट म्हणजे आता मृत्यूचा सापळा बनला आहे. या घाटाचे रुंदीकरण करून त्वरीत अपघाताची मालिका थांबवावी, अशी मागणी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details