महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उभ्या ट्रकला रुग्णवाहिकेची धडक; बीड-परळी मार्गावरील शिरसाळाजवळील घटना - AMBULANCE ACCIDENT NEWS

परळी-बीड मार्गावर शिरसाळा गावाजवळ एक नादुरुस्त ट्रकला रुग्णवाहिकेने धडक दिल्याची घटना घडली.सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

अपघातग्रस्त रुग्णवाहिका
अपघातग्रस्त रुग्णवाहिका

By

Published : Oct 3, 2020, 4:43 PM IST

बीड- रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला रुग्णवाहिकेने धडक दिल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परळी तालुक्यातील सिरसाळाजवळ ही घटना घडली.

परळी-बीड मार्गावर शिरसाळा गावाजवळ एक नादुरुस्त ट्रक रस्त्यावर उभा होता. याच दरम्यान परळीकडून बीडकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेने धडक दिली. त्यामुळे रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये रुग्ण नव्हता. सध्या सर्वत्र कोरोनाची बिकट परिस्थिती असल्याने रुग्णवाहिका चालकांना ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ काम करावे लागत आहे. त्यामुळे असे अनुचित प्रकार घडत असल्याचे रुग्णवाहिका चालकाने सांगितले. अपघातात कुठलीही हानी झाली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details