महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड : गेवराई येथे लॉकडाऊन विरोधात व्यापारी रस्त्यावर - businessman oppose lockdown Gevrai

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी निर्बंध लादल्याने व्यापार्‍यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आज गेवराई शहरातील व्यापार्‍यांनी एकत्रीत येत तहसील कार्यालयासमोर प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

businessman oppose lockdown Gevrai
लॉकडाऊन विरोध व्यापारी गेवराई

By

Published : Apr 6, 2021, 9:07 PM IST

बीड -गेवराई येथील व्यापाऱ्यांनी आज सकाळी अकरा वाजता गेवराई येथील तहसील कार्यालयासमोर लॉकडाऊनबाबतच्या धोरणाविरुद्ध संताप व्यक्त केला.

हेही वाचा -कोरोनाचा कहर: अंबाजोगाईत एकाच चितेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी निर्बंध लादल्याने व्यापार्‍यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आज गेवराई शहरातील व्यापार्‍यांनी एकत्रीत येत तहसील कार्यालयासमोर प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. 'लॉकडाऊन हटाव, व्यापारी बचाव', असे म्हणत व्यापार्‍यांनी आपला निषेध व्यक्त करत तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.

दहा दिवसांचे लॉकडाऊन संपल्यानंतर आता पुन्हा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काल रात्रीपासून कडक निर्बंध लादण्यात आले. या निर्बंधांमुळे व्यापारी चांगलाच अडचणीत सापडला आहे. कोरोनाच्या कार्यकाळात व्यापार्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने व्यापारी संकटात असताना पुन्हा जाचक नियम लादल्याने शहरातील अनेक व्यापार्‍यांनी एकत्रीत येत तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.

सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असले, तरी अनेक व्यापार्‍यांनी दुकाने सुरू ठेवली होती. एकूणच निर्बंधांच्या विरोधात सर्वच व्यापार्‍यांकडून संताप व्यक्त होत असताना दिसून आले. दरम्यान, व्यापार्‍यांनी सहकार्य करावे, शासन आदेशानुसार कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले.

हेही वाचा -परळी: वैद्यनाथ कारखान्याच्या सभासदांना मिळणार सवलतीच्या दरात साखर; पंकजा मुंडेंची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details