महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुधवारी बीडमध्ये आढळले कोरोनाचे 4 नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 17

बीड जिल्ह्यातून बुधवारी ११२ नमुने तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यामध्ये चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये वडवणी तालुक्यातील एक, पाटोदा येथील एक व पाटोदा तालुक्यातील वाली चिखली येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.

beed corona
बुधवारी बीडमध्ये आढळले कोरोनाचे 4 नवे रुग्ण

By

Published : May 21, 2020, 9:18 AM IST

बीड- जिल्हा रुग्णालयाने कोरोना संशयित असलेल्या 114 जणांचे रिपोर्ट बुधवारी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. यापैकी 4 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आता बीडमध्ये एकूण 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली असून, बीड जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बीड जिल्ह्यातून बुधवारी ११२ नमुने तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यामध्ये चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये वडवणी तालुक्यातील एक, पाटोदा येथील एक व पाटोदा तालुक्यातील वाली चिखली येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. आजघडीला बीडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 17 वर पोहोचली आहे. कोरोना पॉझिटिव रुग्णांवर बीड जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत कोरोना रुग्णाच्या संदर्भात शून्यावर असलेल्या बीड जिल्ह्यात झपाट्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढताहेत. पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे मुंबई-पुणे येथून आलेले आहेत. बुधवारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये वडवणी येथील पुरुषाचे वय 67 वर्षे आहे. पाटोदा 73 वर्षीय पुरुष तर वाली चिखली ता. पाटोदा येथील 2 महिला ज्यांची वय 60 व 27 अशी आहेत.

बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची गाव निहाय संख्या पुढील प्रमाणे-

इटकूर 2
हिवरा 1
कवडगाव थडी 2
बीड 5
चंदन सावरगाव 1
केळगाव 1
वडवणी 1
पाटोदा 1
वा.चिखली 2

याशिवाय बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील एका रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णासह एकूण 17 रुग्णांची संख्या आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details