बीड - भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे, मी का सोडू? असा सवाल माजी मंत्री पंकजा मुंडेंनी उपस्थित केला. मी बंड करणार असे सगळे म्हणत होते. मात्र, मी कोणाविरुद्ध बंड करु. मी पक्ष सोडणार अशी पुडी काहींनी सोडल्याचे म्हणत पंकजा मुंडेंनी स्वपक्षीयांना टोले लगावले. तसेच गोपीनाथ मुंडेंच्या रक्तात बेईमानी नाही. जनतेशी नाळ कायम असून पराभवाने खचून जाणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे
- मन मोकळ नाही केलं तर शरीरात विष तयार होतं
- मुंडेसाहेबांच्या मृत्यूनंतरही त्यांचा राजकीय प्रवास सुरु
- पराभवाने खचणार नाही
- १ डिसेंबरला पोस्ट केली, सर्वांना वाटतय काय चाललंय, माझ्या पोस्टआधी संजय राऊत दिसत होते.
- संजय राऊत यांनी करुन दाखवले.
- जनतेशी असणारी नाळ कोणीही तोडू शकत नाहीत
- देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतलेली कळली कशी नाही, सुत्रांना टोला
- सत्ता नसतानाही संघर्ष यात्रा काढली
- कधीही पक्षाकडे हात पसरले नाही
- साहेबांनी कोणाच्या पाठीत कधीच खंजीर खुपसला नाही,
- फार जणांच्या पोटात दुखत आहे
- मी बाहेर प्रचार करत होते
- मी का बंड करणार आणि कोणाविरुद्ध करु
- मला कोणाकडून अपेक्षा नाहीत.
- देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी आमदार
- माझ्या बापाकडून अपेक्षा आहे
- मी बंड करणार ही पुडी कोण सोडली
- देश प्रथम, पक्ष आणि त्यानंतर मी असे मी जगले
- या परंपरेचा भाग आम्ही नाही का
- मी पक्ष सोडावी अशी इच्छा आहे का, चंद्रकांत पाटलांना सवाल
- मला काही मिळू नये म्हणून कारस्थाने होत आहे का?
- गोपीनाथ मुंडेच्या रक्तात बेईमानी नाही
- मला पदाची अपेक्षा आहे
- पक्ष ही प्रकिया आहे. माणसे बदलतील
- हा पक्ष राष्ट्रीय आहे, तो आणखी वाढवा
- कोअर कमिटीच्या पदातून मला मुक्तता द्या दादा
- मी दबाव आणत नाही
- सुप्रिया सुळेंचे डोळ्यातील अश्रू मी पाहिले आहेत.
- माझे अश्रू सुळेंच्या डोळ्यात पाहीले, मात्र, सुळे दुसऱ्या दिवशी स्वागत करत होत्या.
- मी रडून मतं मागत नाही
- देवा तुसुद्धा जातीयवादी आहे का?
- माझे लोक बेईमान झाल्या नाहीत
- फक्त माझीच जागा मला दिली, ७ जागा मागितल्या होत्या, पक्षाने दिल्या नाहीत.
- पक्ष कोणाचाच नाही
- भाजप माझा पक्ष आहे. हा माझ्या बापाचा पक्ष आहे.
- तोंडात आलेला घास आम्हाला घेता आला नाही
- आज स्वाभिमान दिवस आहे, कामाला लागला
- बंड जर नसतं केल तर देश स्वतंत्र झाला असता का?
- बंड करणाऱ्या नेत्यांची समाजाला गरज आहे.
- फाटक्या कपड्यात आम्ही स्वाभिमानी
- मी घरात बसणार नाही
- ४० वर्ष पक्षासाठी काम केलेल्यांना सोडून देणार का
- मला तो पक्ष परत पाहिजे
- सामान्यांची वज्रमूठ करा, पुन्हा उभारणी करा
- मशाल घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार आहे.
- ५ वर्ष मी मंत्री पदावर होते
- मी कोठेही जाऊन काहीही होऊ शकते.
- मी समाजीतल एक घटक आहे.
- मी कधीही म्हणले नाही की गोपीनाथ मुंडेेचे स्मारक बनवा
- उद्धव ठाकरे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा
- २६ जानेवारीला गोपीनाथ मुंडेंच्या नावाने कार्यालय सुरु करणार
- २७ जानेवारील लाक्षणिक उपोषण करणार आहे, मराठवाड्याच्या सिंचनाचे प्रश्न सुटावे म्हणून
- उद्धव ठाकरे संवेदनशील मुख्यमंत्री
- नातं शब्दाच्या पलीकडचे आहे
- भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी मी योगदान दिले
- पंकजा मुंडे शून्यावर आली असे कोणाला तरी वाटत आहे.
- मी जर म्हणले मला मुख्यमंत्री व्हायचे तर चुकलं कुठं
- मी पक्ष सोडणार नाही
- मी सर्वांची वज्रमूठ करणार आहे.
- मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
- पदाची लालसा मला नाही, शेतकऱ्यांसाठी काम करणा
- आता मला बंधणे नाहीत, मी सर्वांची झाली, गुजरात्यांची सुद्धा आहे.
- आता मी राज्याची आहे.
- माझ्या पराभवाची चर्चा
- बेटा काम कर धनंजय मुंडेंना आशिर्वाद
- प्रितम मुंडे तुमचाही मी कान धरु शकते
- पुढे काय करायचे ते करु
- लोकशाही पद्धतीने निर्णय घ्यावेत
- समाजासाठी राजकारणात
- परत एकदा रस्त्यावर आंदोलन करु
- मुख्यमंत्री माझाच भाऊ आहे
- आपले हक्क आपल्याला घ्यायचे आहेत.
- मी बेईमान होणार नाही
चंद्रकांत पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या कार्य मोठे
- गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारांना अंगावर घेतले
- पक्ष मोठा करण्यासाठी मोठ्या पक्षाला अंगावर घेता आले पाहिजे.
- पंकजा ताईंनी मुंडे साहेब गेल्यावरनंतरही समाजाचे नेतृत्व केले.
- मला मान्य आहे की त्यांचा पराभव झाला आहे.
- मी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांचा दु:ख समजू शकतो
- आपल्या तक्रारींची, वेदनांची दखल नक्की घेतली जाईल
- दोघांनाही विनंती करेन,आपल्यावर अन्याय होणार नाही
- आगामी काळात सगळे नीट होईल
- बोलण्यातून जखमा करु नका
- नाथाभाऊंना भावना व्यक्त केल्या, त्यांची चूक नाही
- माणसांच्या चूका झाल्या, पक्षाची चूक झाली नाही.
- आम्ही पक्षात राहणार आहोत, तुम्हाला जायचं तर तुम्ही जा असे म्हणा
- पक्षात राहून संघर्ष करा
- अवेळी काही घटना घडल्या
- या सगळ्यातून मार्ग निघेल
- गिरणी कामगाराच्या मुलाला आमदार केले.