बीड - जिल्हाधिकारी कार्यालय येथे काँग्रेसचे कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
दादासाहेब मुंडे मारहाण प्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित - पोलीस
पोलीस अधीक्षकांनी या सर्व घटनेचा आढावा घेतल्यानंतर हे तीनही कर्मचारी बंदोबस्ताच्या ठिकाणी गैरहजर असल्याचे समोर आले. ही गंभीर बाब लक्षात घेऊन या तिनही कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली.
जिल्हा पोलीस दलातील एस.पी. शेळके, पी.के. सानप या दोन पोलीस हवालदारांसह महिला पोलीस शिपाई डी.व्ही. चाटे या तीन कर्मचाऱ्यांना बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बंदोबस्त दिला होता. सायंकाळच्या सुमारास येथे मारहाणीची घटना घडली. यावेळी हे तिघेही गैरहजर होते.
पोलीस अधीक्षकांनी या सर्व घटनेचा आढावा घेतल्यानंतर हे तीनही कर्मचारी बंदोबस्ताच्या ठिकाणी गैरहजर असल्याचे समोर आले. ही गंभीर बाब लक्षात घेऊन या तिनही कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांची चौकशीही सुरू केली आहे.