महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तीन ठार; दोन जखमी

जिल्ह्यातील पिंपरगव्हाण येथे एकाच कुटुंबातील व्यक्तींमध्ये शेतीच्या बांधावरून तुंबळ हाणामारी झाली आहे.

By

Published : Jul 27, 2019, 2:15 PM IST

Updated : Jul 27, 2019, 5:42 PM IST

हाणामारी

बीड - जिल्ह्यातील पिंपरगव्हाण येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 जण ठार तर 2 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मृतांना बीड जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.


किरण काशिनाथ पवणे , दिलीप काशिनाथ पवणे आणि प्रकाश काशिनाथ पवणे या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर डॉ. सचिन पवने व अॅड. कल्पेश पवने हे जखमी झाले असून त्यांच्यार बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास गतीने सुरू असल्याचे पोलिस उपविभागीय अधिकारी भास्कर सावंत यांनी सांगितले आहे.

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तीन ठार; दोन जखमी


पिंपरगव्हाण रस्त्यालगत वासनवाडी शिवारात पवने कुटुंबाची शेतजमीन आहे. पवणे कुटुंबातील हा शेतीचा वाद अनेक वर्षांपासूनचा आहे. उच्च न्यायालयाने किसन पवणे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र त्या जमिनीवर मृत तिघांचाही ताबा होता अशी माहिती आहे. आज सकाळी कल्पेश शेतीत गेला असता वाद झाला आहे.


विशेष म्हणजे शुक्रवारीच यातील जखमी कल्पेश पवणे याने बीड शहर पोलिसांना आपल्या जीवाला शेतीच्या वादातून धोका असल्याची तक्रार दिली होती, अशी देखील माहिती आहे.


दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी भेट दिली असून त्यांनी तपासाच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस उपाधीक्षक भास्कर सावंत , बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित बडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि दरोडा प्रतिबंधक पथकाचे जवान देखील घटनेत कोणती हत्यारे वापरली असावीत याची माहिती घेत आहेत. अद्यापपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.

Last Updated : Jul 27, 2019, 5:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details