महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे भीषण अपघात; बापलेकीसह तिघांचा मृत्यू - rupali javle

परभणीच्या दिशेने जात असताना, कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने जावळे यांच्या गाडीला समोरून धडक दिली. यात चालक आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर, गंभीर जखमी असलेल्या विनायक जावळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विनायक जावळे हे शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्रपाचार्य होते.

acci
माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे कार -ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

By

Published : Dec 25, 2019, 12:58 PM IST

Updated : Dec 25, 2019, 1:11 PM IST

बीड - आज(25 डिसेंबर) पहाटे माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे कार आणि-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात बापलेकीसह तिघांचा मृत्यू झाला आहे. चालक विजय ज्ञानेश्वर कानडे(वय 24), रुपाली विनायक जावळे (वय 24 रा. परभणी) आणि विनायक दत्तात्रय जावळे (वय 58 रा. परभणी), अशी मृतांची नावे आहेत. विनायक हे आपली मुलगी रुपाली हिला घेऊन परभणीकडे जात असताना हा अपघात घडला.

मृत चालक विजय ज्ञानेश्वर कानडे आणि रुपाली विनायक जावळे

परभणीच्या दिशेने जात असताना, कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने जावळे यांच्या गाडीला समोरून धडक दिली. यात चालक आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर, गंभीर जखमी असलेल्या विनायक जावळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विनायक जावळे हे शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्रपाचार्य होते.

हेही वाचा -सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला पुण्याजवळ अपघात; 16 जखमी

४८ तासात ६जणांचा मृत्यू

पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनातून अपघातग्रस्तांना माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान, बीड जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी अंबाजोगाईजवळ एसटी बस आणि जीप यांच्यात झालेल्या अपघातात तिघे जण ठार झाले होते. गेल्या 48 तासात वेगवेगळ्या अपघातांमध्ये सहा जणांनी आपला जीव गमावला आहे.

Last Updated : Dec 25, 2019, 1:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details