बीड - घरातील एका विद्युत प्रवाह सुरू असलेल्या उघड्या वायरचा शॉक लागून बापलेकीसह चुलत्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी बीड शहरातील गोविंद नगर येथे घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यू पावलेल्यांमध्ये वडमारे कुटुंबातील श्रेया वडमारे, तुळशीराम वडमारे आणि बाळू वडमारे अशी नावे आहेत.
बापलेकीसह चुलत्याचा शॉक लागून मृत्यू; बीड शहरातील गोविंद नगर भागातील घटना - electric shock beed news
घरातील एका विद्युत प्रवाह सुरू असलेल्या उघड्या वायरचा शॉक लागून बापलेकी सह चुलत्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी बीड शहरातील गोविंद नगर येथे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बीड
शहरातील धानोरा रोडवरील गोविंद नगर परिसरात राहणाऱ्या वडमारे कुटुंबातील एक लहान मुलीचा उघड्या वायरला हात लागल्याने शॉक बसला. तिला सोडवण्यासाठी गेलेल्या वडीलांनाही विजेचा धक्का बसला. याच दरम्यान घराच्या बाजूला उभ्या असलेल्या काकांनी हा प्रकार पाहताक्षणीच ते मदतीसाठी धावले. दोघांनाही धरून ओढत असताना त्यांनाही जोरदार धक्का बसला. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.