महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गॅसच्या स्फोटात तीन भावांची घरे जळून खाक; माजलगाव तालुक्यातील घटना - माजलगाव नगरपरिषद बातमी

अचानक घरातील स्वयंपाकाच्या गॅसने पेट घेतल्यामुळे झालेल्या स्फोटात तीन भावांची घरे जळून खाक झाली. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील शिवाजीनगर तांडा येथे ही घटना घडली.

Breaking News

By

Published : Mar 6, 2021, 3:33 PM IST

बीड-अचानक घरातील स्वयंपाकाच्या गॅसने पेट घेतल्यामुळे झालेल्या स्फोटात तीन भावांची घरे जळून खाक झाली. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील शिवाजीनगर तांडा येथे ही घटना घडली. माजलगाव तालुक्यातील शिवाजीनगर तांडा येथे प्रकाश पवार, अशोक पवार, विकास पवार या तिन्ही भावांची घरी आहेत. अचानक स्वयंपाकाच्या गॅसचा स्फोट झाला. या तीन भावांची घरे जळाली आहेत. यात संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. प्रकाश पवार, अशोक पवार, विकास पवार या तिन्ही भावांचे या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले. माजलगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तहसील कार्यालयाकडून घराचे पंचनामे करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details