बीड -गेवराई तालुक्यात एका व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत लुटारुंनी बोलेरो जीपची काच फोडून 9 लाख 15 हजार रुपयाची रक्कम लंपास केली आहे. बळीराम शंभू खरवडे असे त्या लुट झालेल्या कापूस व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
कापूस व्यापाऱ्याला 9 लाखाला गंडा; जीपची काच फोडून लांबवली रक्कम - Bead Police News
या घटनेत लुटारुंनी बोलेरो जीपची काच फोडून 9 लाख 15 हजार रुपयाची रक्कम लंपास केली आहे. बळीराम शंभू खरवडे असे त्या लुट झालेल्या कापूस व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
खरवडे यांनी शेतकऱ्यांचा खरेदी केलेला कापूस गेवराई येथील जिनिंगवर विक्री केला होता. यानंतर या कापसाची रक्कम जिनिंग चालकाकडून खरवडे यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात आली होती. या बळीराम खरवडे यांनी सोमवारी गेवराई येथील पुर्णवादी बँकेतून ७ लाख व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून २ लाख १५ हजार असे एकुण ९ लाख १५ हजार रुपयांची रक्कम काढली. यानंतर ही रक्कम स्वतःच्या जीप (क्र.एम.एच.२३ ए.डी.९००१) मधून घेऊन सिरसदेवी कडे निघाले होते. दरम्यान गेवराई पासून जवळच असलेल्या धुळे-सोलापूर या महामार्गावरील प्रदिप जिनिंगसमोच गाडी उभा करुन चालक काशिनाथ पवार व ते जिनिंगमध्ये गेले. या संधीचा चोरट्यांनी फायदा घेत गाडीची डाव्या बाजूची काच फोडून आतमधील ९ लाख १५ हजाराची रक्कम पळवली.
हा प्रकार व्यापारी खरवडे व चालक पवार यांच्या जिनिंगच्या बाहेर आल्यानंतर निदर्शनास आला. यानंतर पोलिसांना माहिती कळवताच पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. एलसीबी, एडीएस यांना याप्रकरणी माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी बळीराम खरवडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.