बीड (आष्टी)- घरात कोणीच नसल्याचा डाव साधून आष्टी येथील पंचायत समितीसमोरील भागात भर दिवसा प्रा.नवनाथ विधाते यांच्या घराचे कुलूप तोडून एक लाख ४० हजाराची रोख रक्कम व दीड तोळे सोनं लंपास केल्याची घटना आज (सोमवार) दुपारच्या सुमारास घडली आहे.
आष्टीत भरदिवसा चोरी.. एक लाख ४० हजाराच्या रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने लंपास - बीडमध्ये चोरी
घरात कोणीच नसल्याचा डाव साधून आष्टी येथील पंचायत समितीसमोरील भागात भर दिवसा प्रा.नवनाथ विधाते यांच्या घराचे कुलूप तोडून एक लाख ४० हजाराची रोख रक्कम व दीड तोळे सोनं लंपास केले.
याबाबत आष्टी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील मुर्शदपूर भागातील प्रा.नवनाथ विधाते यांच्या घरातील सर्व सदस्य आज आपल्या मुळ गावी नांदूर विठ्ठलाचे येथे गेले होते. दुपारी पावणे दोनच्या सुमारास चोरट्यांनी घर फोडून घरातील रोख रक्कम एक लाख चाळीस हजार रूपये व एक तोळ्याची सोन्याची चैन चोरली. तर आज पहाटेच आष्टी शहरातील सायकड गल्ली येथे राहणारे आर.सी.खुळपे या शिक्षकाच्या घरीही कोणी नसल्याचे पाहून घराचे कुलूप तोडून घरातील जवळपास तीन तोळे सोनं आणि दहा हजार रूपये रोख ऐवज लंपास केला आहे. या दोन्ही घटनास्थळावर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे, मच्छिंद्र उबाळे,अमोल ढवळे यांनी पंचनामा केला.
आम्ही काय शक्तिमान नाही, तुम्ही तुमच्या घराची काळजी घ्या -
आजपर्यंतच्या किरकोळ चोऱ्या असल्याने नागरिकांनी तक्रारी केल्या नाहीत. परंतु सोमवारी पहाटे व दुपारी पावणे दोन वाजता चोरी झाली असून, घटनास्थळी आलेल्या पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे यांनी ज्यांच्या घरी चोऱ्या झाल्या त्यांनाच आम्ही का जादूगर किंवा शक्तिमान नाही. तुम्हाला तुमच्या घराची काळजी घेता येत नाही, तपासाऐवजी असेच ज्ञान ते शिकवीत असलेल्या पोलीस निरीक्षकांसमोर फिर्यादीची अवस्था भिक नको पण कुत्रं आवर अशी झाली होती.