आष्टी (बीड) - आष्टी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इदगाह मैदान परिसरातील एका घरात दुपारी चार वाजता चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
आष्टीत भर दिवसा चोरी, सोने व रोकड लंपास - बीड शहर बातमी
आष्टी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इदगाह मैदान परिसरातील एका घरात दुपारी चार वाजता चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
घटनास्थळ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इदगाह मैदान परिसरात राहणाऱ्या महेंद्र पोतदार यांच्या घरी दुपारी चार वाजता घराचा दारवाजा तोडून घरातील तीन तोळे सोने, दहा हजार रुपये रोख व चांदिचे भांडे लंपास केले आहे. याबाबत महेंद्र पोतदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आष्टी पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा -मुख्याधिकार्यावर अभियंत्याचा चाकू हल्ला; वडवणी येथील घटना